Posts

मोमोज विथ चटणी आणि थुपका

Image
    ~स्वरचित ~ अ. प्रॆ. नौकरकर थंडीत गरमागरम, चमचमीत आणि healthy असं काही खावंसं वाटलं की ही आमची Go-to recipe . बऱ्याच विविध प्रमाणाच्या प्रयत्नांनंतर ही एक मस्त जमलेली recipe. सामग्री: मॉमोज ३०० ग्राम पनकोबी २ मध्यम आकाराचे गाजर २ लहान कांदे ४-५ हिरव्या मिरच्या ३-४ कोथिंबिरीच्या काड्या ३-४ tablespoon मोहरीचे तेल चवीपुरतं मीठ चटणी: १ लहान कांदा ३-४ लसूण कळ्या २-३ लाल सुक्या मिरच्या ३ टेबलस्पून शेंगदाणे २ मोठे लाल टमाटर २ टिस्पून तेल २ टेबलस्पून सोया सॉस चवीपुरते मिठ आणि साखर पाती करता : सम प्रमाणात १.५ कप कणीक आणि मैदा चवीप्रमाणे मीठ घालून मध्यम घट्ट मळून घ्यावी. कृती: एका मोठ्या पातेल्यात सगळी पानकोबी आणि गाजर जाडसर किसून किंवा fine chop करून घ्यावी. त्यातच बारीक चिरलेला कांदा, मिरची आणि कोथिंबीर घालावा. साधारणतः ३ टीस्पून मीठ आणि मोहरीचे तेल घालून हातानी चांगले चोळून घ्यावे आणि १० मिनिटे झाकून ठेवावे. नंत्तर सुटलेले पाणी मुठीत पिळून एका पातेल्यात वेगळे काढून चोथा मोमोज साठी सारण म्हणून घ्यावा. ह्या पाण्यातून नंतर थूपका करावा. मोमोज वळवण्याकरता मळलेल्या कणकीच्या पुरी इतक्या पात्या कर